पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून 38 दशलक्ष घनमीटर लिटर (एमएलडी) आणि भामा-आसखेड धरणातून 60 एमएलडी असे एकूण 98 एमएलडी पाणी साठा आरक्षणाबाबतचा फेरप्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव मंत्रीगटाच्या समितीसमोर 10 दिवसांमध्ये ठेवण्यात येईल. सप्टेंबरअखेर या फेरप्रस्तावाला मान्यता मिळेल, असे विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला. मान्यता मिळाल्यानंतर सदर कामास तीन टप्प्यामध्ये तातडीने सुरूवात केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment