पिंपरी ते आकुर्डी या मार्गावर पालिकेतर्फे उभारण्यात आलेले ग्रेडसेपरेटर दुर्गंधीचे आगार बनले आहेत. ग्रेडसेपरेटरच्या बाजूने करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या भिंतीच्या ठिकाणी पाणी साचून राहिल्याने डास; तसेच दुर्गंधी पसरत आहे. काही ठिकाणी भिंतींवर शेवाळे साचले आहे. गटारींच्या बाजूने चिखल झाला असून, वाहने घसरण्याच्या घटना घडत आहेत. पिंपरीत ग्रेडसेपरेटरच्या छतातून पाणी झिरपत आहे. आकुर्डीत भिंतीवरील फरशा निघाल्या आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने तेथे स्वच्छता करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ग्रेडसेपरेटरची ही दुर्दशा टिपली आहे ‘सकाळ’चे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.
No comments:
Post a Comment