पुणे : इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पदवी, एमबीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बंधनकारक केलेले जातवैधता प्रमाणपत्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १४ ऑगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने शुक्रवारी दिल्या. अन्य अभ्यासक्रमांना यापूर्वी दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. दरम्यान, मागसवर्गीय विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र १४ ऑगस्टपर्यंत सादर केले नाही. तर, त्यांचा प्रवेश हा खुल्या प्रवर्गातून केला जाणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली. राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशादरम्यान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र १० ऑगस्टपर्यत सादर करणे बंधनकारक केले होते. नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना १४ ऑगस्टची अंतिम मुदत आहे. त्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांना विविध तारखा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणत्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी जातवैधता प्रमाणपत्र कधी सादर करायचे याचे सुधारित वेळापत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
No comments:
Post a Comment