जुनी सांगवी : जुनी सांगवी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असुन परिसरातील मुख्य चौकातुन, रस्त्यावर कुत्र्याच्या झुंडींचा मोकाट वावर वाढल्याने नागरिकांना कुत्र्यांच्या दहशतीला सामोरे जावे लागत आहे. येथील माहेश्वरी चौक, मुळानदी किनारा रस्ता, शिंदेनगर, शितोळेनगर प्रमुख रस्ता, वसंतदा पुतळा बसस्थानक, भाजीमंडई परिसर, उद्यान परिसर, नदीघाट परिसर आदी सार्वजनिक ठिकाणी मोकाट भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कुत्री अचानक नागरिकांच्या अंगावर धावुन जातात.

No comments:
Post a Comment