भारतीय संस्कृतीने अन्न हे पूर्णब्रह्म मानले आहे. ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे,’असे जेवणाआधी वंदन करण्याची प्रथा आहे. मात्र, जीवनात आपले आचरण वेगळेच दिसते. जागतिक क्रमवारीनुसार भुकेल्या देशांच्या यादीत भारत 67वा, तर अन्न वाया घालवणार्यांमध्ये सातव्या क्रमांकाचा देश ठरला आहे. हे वास्तव सर्वांना सुन्न करणारे आहे. अन्नाची ही नासाडी रोखण्यासाठी जैन समाजातील तरुण गेल्या काही वर्षांपासून प्रबोधन करत आहेत.

No comments:
Post a Comment