पिंपरी – रिटेल क्षेत्रामध्ये सरकारने शंभर टक्के थेट परकीय गुंतवणुकीला दिलेल्या मंजुरीच्या विरोधात “कॅट’ या व्यापारिक संघटनेने देशव्यापी “भारत व्यापार बंद’चे आवाहन केले होते. शहरातील बहुतेक सर्वच व्यापारी आणि व्यावसायिक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आणि समर्थन देण्याची घोषणा केली होती. परंतु शहरामध्ये तसेच उपनगरांमध्ये या “बंद’ला अतिशय थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. शहरातील सुमारे 4500 दुकानांपैकी 20 टक्के दुकाने देखील बंद नव्हती. सामान्य नागरीक तर दूरच परंतु कित्येक व्यापाऱ्यांनी देखील या “बंद’ बद्दल कल्पना नसल्याचे दिसून आले.

No comments:
Post a Comment