नैसर्गिक वायूच्या वापरासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. या संकल्पनेतुन इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेला बायोगॅस प्लांट भेट देण्यात आला.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बायोगॅस प्लांट भेट देण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल, रेखा मित्रगोत्री, रंजना कदम, नेहा देशमुख, आरती मुळे, रेणू मित्रा, मुक्ती पानसे, वैशाली देवतळे, अर्जुन दलाल आदी उपस्थित होते. ज्ञानप्रबोधिनी निगडी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment