चिंचवड केशवनगर येथील भक्ती रेसिडेन्सी सोसायटीतील पर्यावरण पूरक ‘पुष्प महाल’ असा देखावा साकारला आहे. भक्ती रेसिडेन्सी सोसायटी गणेशउत्सवाचे अकरावे वर्ष आहे. सोसायटीचा गणेशोत्सव ही खूपच चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व जण एकत्र येऊन आपापसांत आपुलकीची भावना वाढीस लागेली दिसून येते. या सात दिवसाच्या गणपती उत्सवातील सोसायटीचे वातावरण उत्साहाचे होते. विशेष म्हणजे या भक्ती रेसिडेन्सी सोसायटीचा ‘पुष्प महाल’ देखावा हा कमी कालावधी आणि कमी खर्चात साकारला आहे. कापडी फुले, रद्दी, वर्तमानपत्रे, टाकाऊ लाकडे इत्यादी साहित्यांपासून सोसायटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून देखावा साकारला आहे.
No comments:
Post a Comment