पिंपरी - आयुष्यात प्रत्येकाने मोठे स्वप्न पाहिले पाहिजे. भविष्याचा विचार करून आपल्या कल्पना बाजारपेठेत किती वर्षे टिकू शकतात, याचा विचार करून त्याला मूर्त स्वरूप द्यावे, तरच तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता, असा सल्ला महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला. येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेतर्फे स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर सुरू केले जाईल. शहरातील स्टार्टअप्सना एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment