पिंपरी – शहरात अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कारवाईत जप्त केलेली हातगाडी, टपरी, वाहन व साहित्य परत करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी अव्वाच्या सव्वा दंडाची रक्कम वाढविली होती. दंडाच्या रकमेला हातगाडी संघटनांनी विरोध दर्शविला असताना त्यांचा विरोध डावलून दंडाची आकारणी करुन त्यानुसार कारवाई सुरु केली. परंतु, सव्वा महिन्यानंतर आयुक्तांना उपरती आली आहे. जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत त्यांनी दंडाची रक्कम निम्म्यावर आणली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी (दि. 18) मान्यता दिली.
No comments:
Post a Comment