Tuesday, 16 October 2018

भीमसृष्टीचा ऑक्टोबरचाही मुहूर्त हुकला

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात त्यांच्या जीवन प्रसंगांवरील म्युरल्स लावून भीमसृष्टी तयार करण्याचे काम अद्याप सुरू आहे. मात्र, अद्याप कांस्य धातूचे सर्व म्युरल्स तयार झालेले नाहीत. किमान दीड महिन्यांचा कालावधी म्युरल्स  बसविण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबरला भीमसृष्टी तयार करण्याचा सत्ताधारी भाजपाचा संकल्प अपूर्ण राहिला आहे. सध्याचे काम पाहता भीमसृष्टी वर्षअखेरीत डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment