पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा उचलण्याच्या ठेक्यावरून विरोधकांनी भाजपला आपले लक्ष्य केले आहे. ही निविदा चुकीची असून, जुनीच निविदा मंजूर करायची होती, तर नवीन निविदा प्रक्रिया का राबविली असा सवाल उपस्थित करत, या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी हे काम कायद्याचे पालन करत, निविदेनुसार ही प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी केली आहे. तर हा ठेकाच रद्द करण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे.
No comments:
Post a Comment