पिंपरी – सध्या बदलत्या वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढत असतानाच काही महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेषतः व्हिटामीन-सी च्या औषधांचा स्टॉक संपत आला असून उत्पादन देखील कमी झाले असल्याचे औषध विक्रेत्यांचे मत आहे. ही औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालापैकी 60 टक्के कच्चा माल चीनमधून येतो. या कच्च्या मालाचा पुरवठा थांबल्यामुळे तसेच सरकारकडून काही औषधांच्या किंमतींवर नियंत्रण घालण्यात आल्याने देखील उत्पादन कमी झाले आहे.
No comments:
Post a Comment