पिंपरी - रेडझोनचा प्रश्न सुटत नसल्यामुळे तळवडे परिसरातील आयटी कंपन्यांचा विस्तार रखडला आहे. येथील काही कंपन्यांनी विस्तारासाठी परवानगी मागितली होती. मात्र, हा परिसर रेडझोनमध्ये येत असल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही. या विस्तारासाठी संरक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र एमआयडीसीने केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

No comments:
Post a Comment