पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व अधिका-यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यानंतर दिल्लीतील शाळांच्या धर्तीवर शाळांचा सुधारणार असल्याचा निर्धार सर्वपक्षीय गटनेत्यांनी घेतला आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दिल्लीतील शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षणसाठी दिल्लीत पाठविले जाईल. तसेच शिक्षकांचा वर्ग घेण्यात येणार आहे. शिक्षकांची नकारात्मक भुमिका असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात पालिकेच्या शाळामागे राहिले आहेत. त्यामुळे शिक्षकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे महापौर राहुल जाधव म्हणाले.
No comments:
Post a Comment