Saturday, 13 October 2018

मुलभुत सुविधांअभावी दापोडीतील सिद्धार्थनगर वंचित

नी सांगवी - दापोडी प्रभागातील शेवटचे टोक असलेला पुणे मुंबई रस्त्यालगतचा सिद्धार्थनगर हा जवळपास सात ते आठ हजार लोकवस्तीचा भाग आहे. एकीकडे शहराच्या भरभराटीत तितकाच दुर्लक्षित व मागास राहिल्याचे येथील मुलभुत प्रश्नांनी समोर येत आहे. एकीकडे पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या वल्गना करीत असताना येथील नागरीकांना मुलभुत सुविधाच व्यवस्थित मिळत नसल्याने आम्ही ही माणसं आहोत अशी आर्त हाक येथील रहिवाशांकडुन ऐकायला मिळते. तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव यामुळे सिद्धार्थनगर रहिवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. उघडी गटारे तुंबलेले चेंबर,झाकणं नसलेले चेंबर यामुळे मैलामिश्रितपाणी रस्त्यावर येत आहे. नागरीकांना यातुनच रहदारी करावी लागते. लहान मुले, जेष्ठांचे आरोग्य अबाधित कसे राहणार असा प्रश्न सर्वसामान्यांमधुन विचारला जात आहे. या भागात कष्टकरी कामगार, मजुरवर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. 

No comments:

Post a Comment