Thursday, 29 November 2018

पालिकेच्या उर्दू शाळांत 38 शिक्षकांची कमतरता

शाळेच्या पटसंख्येसाठी आधीच बदनाम असलेल्या महापालिका शाळांमध्ये आता विद्यार्थी संख्या वाढत असताना शिक्षकांची संख्या कमी असल्याचे चित्र आहे. शिक्षक भरती नसल्यामुळे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या 14 उर्दू प्राथमिक शाळांमध्ये शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षकच नाहीत. त्यामुळे सध्या शाळांमधील शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्ग एकत्र करून शिकवावे लागत आहे.  शहरामध्ये उर्दू माध्यमाच्या एकूण 14 शाळा आहेत. यामध्ये संच मान्यतेनुसार 131 शिक्षकांची गरज असताना सध्या फक्त 93 शिक्षकच शिकविण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे 38 शिक्षक याठिकाणी कमी आहेत. 

No comments:

Post a Comment