चौफेर न्यूज – आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्याचा याचा फायदा भारताला झाला आहे. पेट्रोल- डिझेलच्या उत्पादनावरील खर्च कमी झाल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून कपात सुरु आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोल ४२ पैशांनी स्वस्त होऊन प्रति लिटर ७९.६२ रूपये आहे. सहा आठवड्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये १२ रुपयांनी तर डिझेलच्या दरांत १३.६४ रूपयांनी कपात झाली आहे. एकवेळ पेट्रोलच्या किंमतीने ९० चा आकडा पार केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment