पुणे : वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्यात नागपूर, मुंबई आणि पुण्यात मेट्रो मार्गिकांचे जाळे निर्माण केले जात आहे. शहरात पीएमपी आणि मेट्रोच्या माध्यमातून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत आहे. भविष्यातील या वाहतुकीसाठी एकच तिकीट असावे, असे नियोजन सुरू आहे, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात केले. पुणेकर जगाला सल्ले देतात. त्यांचे सल्लेही चांगले असतात. मात्र याच सल्ल्यांमुळे मेट्रोच्या कामाला काही काळ विलंब झाला. मात्र उशीर होऊनही मेट्रोचे काम वेगात प्रगतिपथावर आहे, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment