जुनी सांगवी - जुनी सांगवी - दापोडीला जोडणा-या पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावर डांबराचा थर निघाल्याने खड्डे पडले होते. दापोडी, पिंपरी, पुण्याकडे जाण्यासाठी या पुलाचा रहदारीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. गेल्या काही महिन्यांपासुन येथील डांबराचा थर ठिकठिकाणी निघुन गेल्याने पुलावर छोटे खड्डे पडले होते. अनेकदा खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाक्या घसरण्याचे प्रकार येथे वारंवार घडत होते. तर खड्ड्यांमुळे वहातुक कोंडी होवुन रहदारीस अडथळा येत होता.


No comments:
Post a Comment