पिंपरी - राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी जाहीर केली असली तरी शहरात अद्याप अनेक ठिकाणी या पिशव्यांचा वापर सुरू आहे. तो रोखण्यासाठी महापालिकेने ३२ पथके नेमली आहेत. त्यांच्या वतीने शहरात कारवाई सुरू असते. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आदी भागांतील भाजी मंडईंमध्ये काही विक्रेते सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करताना आढळतात. काही नागरिक अद्यापही बिनधास्तपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भाजी घेऊन जाताना दिसतात. प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन जाताना महापालिकेच्या पथकाकडून पकडले गेल्यास कारवाई होऊ शकते, याची जाणीवही काहींना नाही. या संदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ‘‘मंडईमध्ये महापालिकेची पथके पाठविण्यात येतील. पिशव्यांमध्ये भाजी देताना विक्रेता आढळल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.’’
No comments:
Post a Comment