Thursday 6 December 2018

पंतप्रधान मोदिंची एमएसएमई उद्योजकांसाठी 59 मिनीटात एक कोटी घोटाळेबाज कर्जयोजना – आप्पासाहेब शिंदे

पिंपरी (दि. ३ डिसें. ) :-  पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या ‘एम. एस. एम. ई. उद्योजकांसाठी ५९ मिनिटात १ कोटी कर्जयोजना’ ही फसवी, निराधार, घोटाळेबाज योजना असून, केवळ निवडणुकीत सहकार्य केलेल्या आपल्या जुन्या मित्रांना आर्थिक मदत करून अर्थसंबंध जपण्यासाठी चराऊ कुरण आहे. देशात अनेक राष्ट्रीयीकृत बँका या कामासाठी पात्र असतानाही त्यांच्याकडे या कामाची जबाबदारी न देता मोदींनी गुजरातस्थित एका संस्थेस या कामाचे कंत्राट दिले आहे.  ‘उद्योजकांच्या हितासाठी’ या गोंडस नावाखाली एम. एस. एम. ई. चा आधार घेत शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा हेतू हाणून पाडल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा, पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमेर्स, सर्विसेस अँड अग्रीकल्चर या संस्थेचे अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment