Thursday, 6 December 2018

चिखली, कुदळवाडी भागातील भंगार व्यावसायिकांना पालिकेतर्फे ‘नोटीसा’

आमदार महेश लांडगे यांनी केला पाठपुरावा
पिंपरी : चिखली, मोशी, कुदळवाडी परिसरातील भंगार व्यावसायिक दुरुउपयोगी साहित्याची जाळून विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वायूप्रदुषण करणा-या भंगार व्यावसायिकांना पालिकेतर्फे देण्यात येणा-या सोयी-सुविधा बंद कराव्यात. भंगार व्यावसाय सात दिवसात बंद करावेत, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिल्या 5 नोव्हेंबर रोजी दिल्या होत्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 80 व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment