पिंपरी – शहरात सध्या मोठ्या प्रमाणात डेंगू आणि मलेरियाचे रुग्ण आढळू लागले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आजार पसरणाऱ्या डासांचा उपद्रव शहरात वाढू लागतो. परंतु यावर्षी जलपर्णीमुळे ऑक्टोबर महिन्यापासून डासांचा उपद्रव आणि आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने शहरातील प्रत्येक ठिकाणी निरीक्षण आणि परिक्षण केले. या परिक्षण अहवालानुसार नदी प्रदूषण, जलपर्णी आणि डास उत्पत्तीमध्ये सांगवी परिसर सर्वांत पुढे आहे.

No comments:
Post a Comment