पिंपरी - ""मीटरनुसार पाणीपट्टी भरणाऱ्या कुटुंबांना दरमहा किमान शंभर रुपये बिल आकारण्याचा निर्णय चुकीचा असून, तो रद्द करावा,'' असे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी "सकाळ'शी बोलताना शुक्रवारी स्पष्ट केले. किमान बिलआकारणीमुळे कमी पाणी वापरणाऱ्या नागरिकांना दिलेली सवलत मिळणार नाही, त्यांना विनाकारण जादा रक्कम भरावी लागेल, याकडे जगताप यांनी लक्ष वेधले. या संदर्भात त्यांनी महापौर नितीन काळजे यांना कळविले आहे.
No comments:
Post a Comment