निगडी – हरित क्रांती मोहिमेंतर्गत जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र, आकुर्डी शाखा आणि विविध समाजा तर्फे वृक्ष लागवड अभियान राबवण्यात आले. वृक्ष रोपणाच्या महत्त्वाबद्दल मो. शुकरुल्लाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्र परिसरात 15 प्रकारची 110 लहान-मोठी झाडे लावण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शेख मुसा, जिल्हा संघटक एम. आय. शेख, शेख मसूद व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment