हिंजवडी : वाकड येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील पुलापासून हिंजवडीपर्यंत रस्ता रूंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी 19 कोटी 58 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असताना जादा दराची आलेली निविदा स्वीकरत रुंदीकरणासाठी 20 कोटी 55 लाख रुपयांचा खर्चाला स्थायी समितीत मान्यता देण्यात आली. वाकड येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील पुलापासून हिंजवडी येथे पिंपरी महापालिका हद्दीपर्यंत बीआरटी कॉरिडॉरवर रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या रस्ता रूंदीकरणासाठी 19 कोटी 58 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 19 कोटी 46 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या.
No comments:
Post a Comment