Saturday, 12 January 2019

बोपखेल रस्त्याच्या जागेपोटी लष्कराला जागा देण्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

बोपखेल गावासाठी  मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला लष्कराची चार एकर जागा आवश्यक आहे. या जागेच्या मोबदल्यात तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याची लष्कराची मागणी आता पूर्ण केली जाणार आहे. पुणे किंवा पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत लष्कराला जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लष्कराला कोणती जागा उपलब्ध करून द्यायची याबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे राज्याच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना शुक्रवारी (दि. ११) आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर बोपखेलगावच्या रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याचा सरकार आणि महापालिकेचा प्रयत्न राहिल, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

No comments:

Post a Comment