Friday, 1 March 2019

शहारध्यक्ष आमदार जगताप यांच्याकडून अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांचा मास्टरगेम

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामधील सद्यस्थितीला अनधिकृत बांधकाम हा मोठा गंभीर प्रश्न आहे. यामूळेच शहराच्या राजकरणात पक्षांतर्गत सह अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काॅग्रेसनं याच मुद्द्याला वेठीस धरून शहरात सर्वत्र जोरदार फ्लेक्सबाजी करत नागरीकांसाठी काहीही न केल्याचे विद्यमान सरकारतील शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप विरूद्ध ताशेरे ओढलेत. या सर्व बाबींना बघता जगताप यांनी प्रतित्युर फक्त कार्यातूनच देणे गरजेच झालं होतं. त्यानुसार अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणाऱ्या शास्तीकर माफीची, पिं.चिं शहरातील प्राधिकरणाच्या जागेवर उभारण्यात आलेली अनधिकृत घरे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकृत करण्यात यावेत. तसेच बांधकामांचा आराखडा एफएसआयनुसार मंजूर करण्यात यावी अशी मागणी आमदार जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment