आंद्रा व भामा-आसखेड धरणातून आणण्यात येणारे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून त्या परिसरातील भागांत पाणीपुरवठा केला जाणार आहे. या केंद्राच्या निविदेसाठी एकूण 3 निविदा पालिकेस प्राप्त झाल्या आहेत. तर, देहूगावच्या इंद्रायणी नदीवरील बंधारा ते चिखली केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. भामा-आसखेड धरणातील 60.79 दलघमी व आंद्रा धरणातील 38.87 दलघमी असे एकूण 99.66 दलघमी इतके आरक्षित पाणी साठ्यास जलसंपदा विभागाने पालिकेस 24 ऑक्टोबर 2018 ला मंजुरी दिली आहे. त्यानुसार पुनर्स्थापनेच्या एकूण 238 कोटी 53 ला खर्चापोटी 45 कोटींचा पहिला हप्पा पालिकेने नोव्हेंबर 2018 ला अदा केला आहे.
No comments:
Post a Comment