पुणे – शासकीय संगणक टायपिंग परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतीत न भरल्यास व अर्जातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षण संस्थांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेला आहे. याचा संस्थांनी धसकाच घेतला आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने शासकीय संगणक टायपिंग परीक्षा, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्टर्स अँड स्टुड्टस या परीक्षा दरवर्षी घेण्यात येतात. यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फी घेण्यात येते.
No comments:
Post a Comment