महापालिकेने वैद्यकीय सुविधा सक्षमीकरणावर भर देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, शहरातील नागरिकांना माफक दरात वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, त्याऐवजी या सुविधेचे खासगीकरण करण्यावर महापालिका प्रशासनाकडून भर दिला जात आहे. ही बाब भविष्यात अडचणीची ठरू शकते. पालिकेच्या वैद्यकीय सुविधेच्या केंद्रबिंदूस्थानी वायसीएम रुग्णालय राहिले आहे. मात्र, या रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी भोसरीत 100 बेड क्षमतेचे रुग्णालय बांधून ते खासगी संस्थेला 30 वर्षे एवढ्या दीर्घ मुदातीवर चालवायला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर केला आहे. तो विंखंडीत करण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment