आयुक्तांचे स्पष्टीकरण : शहरातील काही भागांमध्ये मात्र ठराविक वेळेतच दुकाने उघडी
पिंपरी -“करोना’चे अधिक रुग्ण आढळलेलले काही भाग महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. याच भागात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने निश्चित करुन दिलेल्या वेळेत उघडण्यात येतील, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त शहरातील इतर भागांमध्ये किराणा दुकानांना वेळेचे बंधन घालण्यात आलेले नाही. परंतु शहरात काही प्रमुख भागांमध्ये ठराविक वेळेतच दुकाने उघडी ठेवण्यास सांगून अन्य वेळेत सरसकट दुकाने बंद करायला लावली जात आहेत. अशा प्रकारे दुकानदार आणि नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून होत आहेत.
No comments:
Post a Comment