- पोलिसांचे काम वाढले ः साडेतीन हजारांवर गुन्हे दाखल
पिंपरी – “करोना’मुळे सध्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गुन्हे कमी झाले की पोलिसांचे काम कमी होणे अपेक्षित आहे. परंतु “करोना’मुळे पोलिसांच्या कामात भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात दिवसाला सरासरी 75 ते 80 फोन येत आहेत. यामध्ये गर्दी केल्याचे सर्वाधिक फोन आहेत. आमचा शेजारी सारखा खोकतोय, अशी तक्रार करणारे फोनही पोलिसांना येत आहेत. यामुळे पोलिसांची चांगलीच छमछाक होत आहे.
No comments:
Post a Comment