पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या लढ्यासाठी राज्य सरकार सज्ज असून त्यासाठी सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे दीड हजार व्हेंटिलेटर, अडीच लाख एन 95 मास्क उपलब्ध असल्याची माहिती टोपे यांनी दिली. राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.


No comments:
Post a Comment