नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आता जन्मतारीख अद्ययावत करण्यासाठी ऑनलाइन वैध पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारेल. ई-केवायसी प्रक्रियेत, ग्राहकांना जन्म प्रमाणपत्र देण्याची एक प्रणाली आहे. कामगार मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कोविड -१९’ या साथीच्या आजरा दरम्यान ऑनलाइन सेवांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. ईपीएफओने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना या संदर्भात सुधारित अधिसूचना जारी केली आहे, जेणेकरुन पीएफ सदस्यांचा जन्म प्रमाणपत्र म्हणून आधार कार्डचा वापर होऊ शकेल. अशा प्रकारे हे सुनिश्चित केले जाऊ शकते की युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) साठी केवायसीची पूर्तता वाढेल.
No comments:
Post a Comment