पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – “लॉकडाऊन’चा तिसरा टप्पा जाहीर केल्यानंतर काही गोष्टींमध्ये शिथिलता आणण्यात आली. या शिथिलतेचा नागरिकांना प्रचंड गैरफायदा घेतल्याने “करोना’च्या समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. सोमवारी एकाच दिवशी गावी जाऊ इच्छिणाऱ्या मजूरांसह हजारो तळीराम रस्त्यांवर उरतल्यामुळे लॉकडाऊन संपुष्टात आल्यासारखेच चित्र शहरात पहावयास मिळाले. अनेकजणांनी स्वत:चे वाहने काढून बाजारपेठेसह शहराचा फेरफटका मारल्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या वाढण्याची भिती सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही एकीकडे मद्यप्रेमींनी दिवसभर दारुच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या तर गावी जाऊ इच्छिणाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दवाखान्यांजवळ सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत गर्दी केली.
No comments:
Post a Comment