Wednesday, 6 May 2020

राज्यात ‘मद्य’ विक्रीसाठी आता ‘टोकन’ पद्धत, गर्दी टाळण्यासाठी सरकरकडून नवी ‘नियमावली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर राज्य सरकारनं जीवनावश्यक नसलेल्या पण महसूलाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या मद्य विक्रीला सशर्त परवानगी दिली होती. मात्र, पहिल्याच दिवशी नागरिकांनी मद्य विक्रीच्या दुकानासमोर प्रचंड गर्दी केली. ही गर्दी टाळण्याचा सरकारपुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यावरही राज्य सरकारने मार्ग काढला आहे. आता मद्य खरेदी करणाऱ्यांना टोकन पद्धतीने मद्य खरेदी करावी लागणार आहे. तसेच मद्य विक्री करणाऱ्यांना टोकण पद्धतीनुसारच मद्य विक्री करावी लागणार आहे. त्यासाठीची नियमावली राज्य उत्पादन शुल्क विभागानं जारी केली आहे. 

No comments:

Post a Comment