Monday, 9 July 2012

इंजिनीअरिंगसाठी मोफत वेबसाइट

इंजिनीअरिंगसाठी मोफत वेबसाइट: इंजिनीअरिंगच्या शाखा कोणत्या आहेत? कॉलेज आणि शाखा निवडताना कोणती काळजी घ्यावी? याचबरोबर ऑप्शन फॉर्म कसा भरावा इथपर्यंत सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

पाऊस पडताच स्वाइन फ्लूची धास्ती

पाऊस पडताच स्वाइन फ्लूची धास्ती: पिंपरी-पुणे। दि. २४ (प्रतिनिधी)

स्वाइन फ्लूची धास्ती अजूनही पिंपरी-चिंचवड व पुणेकरांमध्ये कायम आहे. त्यातच मार्च-एप्रिल महिन्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळल्याने आणि ९ जणांचा मृत्यू झाल्याने ‘एच १ एन १’ लाट पुन्हा आल्याची स्थिती निर्माण झाली होती. आता पाऊस पडू लागताच तपासणीसाठी येणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अवघ्या तीन महिन्यात ७५ हजार पुणेकरांची तपासणी केली आहे. त्यापैकी २११ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Flood alert mock drill held in Chinchwad

Flood alert mock drill held in Chinchwad: Flood alert mock drill held in ChinchwadPIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Saturday conducted a mock drill to check the civic administration's preparedness to handle a flood situation in the city.

Jambe village deputy sarpanch shot dead

Jambe village deputy sarpanch shot dead: HINJEWADI: The deputy sarpanch of Jambe village in Mulshi taluka, Jalinder Suresh Temgire (29), was shot dead by unidentified assailants late on Saturday night on Jambe-Nere road.

भोसरीत दुकानदारांनी बळकावला पदपथ !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31093&To=9
भोसरीत दुकानदारांनी बळकावला पदपथ !
भोसरी, 25 जून
भोसरीतील वाहतूक दिवसेंदिवस जटील होत असून सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत येथील आळंदी रोडवर अक्षरशः वारीचे स्वरूप येते. येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. पादचा-यांसाठी पदपथ तयार करण्यात आले. परंतु या पदपथाचा उपयोग पादचा-यांच्या व्यतिरिक्त येथील दुकानदारच करताना दिसत आहेत. या दुकानदारांनी आपला माल या पदपथावर मांडून ठेवल्यामुळे पादचा-यांना पुन्हा रस्त्यावरूनच जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

प्रक्रिया न करताच सांडपाणी इंद्रायणीत

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31090&To=5

प्रक्रिया न करताच सांडपाणी इंद्रायणीत
पिंपरी, 24 जून
कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी आणि मलमिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडण्यात येत असल्याने नदीत प्रदूषित होत आहे. त्यामुळे मलनिस्सारण प्रक्रियेचे काम दिलेल्या ठेकेदाराला पोसण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका करीत असल्याचा आरोप नदी विकास मंचतर्फे करण्यात आला आहे.

निगडी उड्डाणपुलाखालील स्टॉल्सच्या फलकांमुळे अपघाताला आमंत्रण

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31077&To=6
निगडी उड्डाणपुलाखालील स्टॉल्सच्या
फलकांमुळे अपघाताला आमंत्रण
पिंपरी, 24 जून
निगडीच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली खासगी वाहतूकदारांच्या दुकानावर लावलेले फलक सध्या येथून जाणा-या वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरले आहेत. या फलकांमुळे वाहनचालकांना तसेच पादचा-यांना इतर दिशेकडून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे अनेकदा याठिकाणी छोटे-मोठे अपघात होत असतात. हे सर्व फलक त्वरित काढले जावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.