http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31093&To=9
भोसरीत दुकानदारांनी बळकावला पदपथ !
भोसरी, 25 जून
भोसरीतील वाहतूक दिवसेंदिवस जटील होत असून सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत येथील आळंदी रोडवर अक्षरशः वारीचे स्वरूप येते. येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. पादचा-यांसाठी पदपथ तयार करण्यात आले. परंतु या पदपथाचा उपयोग पादचा-यांच्या व्यतिरिक्त येथील दुकानदारच करताना दिसत आहेत. या दुकानदारांनी आपला माल या पदपथावर मांडून ठेवल्यामुळे पादचा-यांना पुन्हा रस्त्यावरूनच जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
No comments:
Post a Comment