Monday, 9 July 2012

निगडी उड्डाणपुलाखालील स्टॉल्सच्या फलकांमुळे अपघाताला आमंत्रण

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31077&To=6
निगडी उड्डाणपुलाखालील स्टॉल्सच्या
फलकांमुळे अपघाताला आमंत्रण
पिंपरी, 24 जून
निगडीच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली खासगी वाहतूकदारांच्या दुकानावर लावलेले फलक सध्या येथून जाणा-या वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरले आहेत. या फलकांमुळे वाहनचालकांना तसेच पादचा-यांना इतर दिशेकडून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे अनेकदा याठिकाणी छोटे-मोठे अपघात होत असतात. हे सर्व फलक त्वरित काढले जावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

No comments:

Post a Comment