Wednesday, 5 September 2012

भाजप-राष्ट्रवादी हाणामारी, ८ अटकेत

भाजप-राष्ट्रवादी हाणामारी, ८ अटकेत: चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात एका गटातील आठ जणांना रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली.

गिर्यारोहक आनंद बनसोडे लिम्का रेकॉर्डमध्ये

गिर्यारोहक आनंद बनसोडे लिम्का रेकॉर्डमध्ये: - ६,३00 मीटर उंचीवर गिटारवादन
पिंपरी। दि. २ (क्रीडा प्रतिनिधी)

भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचा आनंद बनसोडे याने माउंट एव्हरेस्ट मोहिमेत कॅम्प -२ या ६ हजार ३00 मीटर (२0 हजार ६६९ फूट) या सर्वांंत उंच शिखरावर अतिथंड बर्फाळ वातावरणात गिटारवर राष्ट्रगीत वाजविले. या विक्रमाची नोंद नुकतीच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

वादनासाठी बनसोडेने परदेशातून विशेष बॅग व उंचावरील कमी तापमानात चालणारे कमी वजनाचे अँम्प्लिफायर आणले होते. कमी वजनाची गिटारही बनवून घेतली होती. गिटारवादनाच्या वेळी पथकातील सहकारी व शेर्पा असे दहापेक्षा अधिक जण उपस्थित होते. जगातल्या सर्वोच्च उंचीवर ६ मे रोजी भारताचे राष्ट्रगीत वाजवले गेले. तो सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. हा विक्रम करणारा बनसोडे मूळचा सोलापूरचा आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्टच्या मध्यरात्री कॅलिफोर्निया राज्यातील (अमेरिका) माउंट शास्ता शिखरावर राष्ट्रगीत वाजवून त्याने स्वातंत्र्यदिन साजरा करीत एक आगळावेगळा पराक्रम केला होता. एव्हरेस्ट कॅम्प -२ वर हा विक्रम करून बनसोडेने स्वप्न पूर्ण केले. देशासाठी प्रत्येकानेच काही तरी केले पाहिजे, असे त्याला वाटते.

रिक्षांच्या काचा फोडून मिलिंदनगरमध्ये दहशतीचा प्रयत्न

रिक्षांच्या काचा फोडून मिलिंदनगरमध्ये दहशतीचा प्रयत्न: पिंपरी । दि. २ (प्रतिनिधी)

येथील मिलिंदनगरमध्ये चार रिक्षांच्या काचा फोडून नुकसान करून दहशत माजविण्याचा प्रकार घडला. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. रात्री दोननंतर हा प्रकार घडला असून, त्रास देण्याच्या आणि नुकसान करण्याच्या उद्देशानेच काही विघ्नसंतोषी लोकांनी हे कृत्य केले असावे, अशी शक्यता वाहनमालकांनी व्यक्त केली. या परिसरात वाहनांची मोडतोड करून दहशत माजविण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहेत.

माता न तू वैरिणी

माता न तू वैरिणी: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

चिचंवडमध्ये पवना नदी पात्राजवळ पंधरा दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडले. नदीपात्राकडे गेलेल्या लहान मुलांच्या ते दृष्टीस पडले. त्यांनी आपल्या आईवडिलांना याबाबत सांगितले. चिंचवड पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून त्याबाबत माहिती मिळताच त्यांनी अर्भकाला वायसीएम रुग्णालयात हलविले. एकीकडे जन्मदात्या माता पित्यांची निर्दयता अनुभवणारे हे बालक आता समाजातून पाझरणारा मानवतेचा ओलावा अनुभवत आहे. वायसीएम रुग्णालयातील बालरोग कक्षात ते सुरक्षित आहे.

पूर्ववैमनस्यातून चिंचवडला हाणामारी

पूर्ववैमनस्यातून चिंचवडला हाणामारी: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

पूर्वीचे राजकीय वैमनस्य आणि अवैध प्रवासी वाहने भरण्याच्या वादातून भाजप नगरसेवक शीतल शिंदे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळुराम पवार यांच्या गटांतील कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. चिंचवड स्टेशन येथे शनिवारी सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. त्यात पवार यांच्यासह त्यांचा भाऊ आणि मेहुणा जखमी झाला. तर शिंदे यांचे ७ कार्यकर्ते जखमी असून त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. पवार यांच्यावर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात तर अन्य जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

State-level dhol-tasha contest to be held

State-level dhol-tasha contest to be held: The Sakal Media Group will organise a state-level dhol-tasha competition to encourage artistes in this music form.
State-level dhol-tasha contest to be held

Wakad set to lose lake, get more concrete jungle

Wakad set to lose lake, get more concrete jungle: PCMC general body passes proposal to convert water body into residential zone with NCP voting in favour.