गिर्यारोहक आनंद बनसोडे लिम्का रेकॉर्डमध्ये: - ६,३00 मीटर उंचीवर गिटारवादन
पिंपरी। दि. २ (क्रीडा प्रतिनिधी)
भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचा आनंद बनसोडे याने माउंट एव्हरेस्ट मोहिमेत कॅम्प -२ या ६ हजार ३00 मीटर (२0 हजार ६६९ फूट) या सर्वांंत उंच शिखरावर अतिथंड बर्फाळ वातावरणात गिटारवर राष्ट्रगीत वाजविले. या विक्रमाची नोंद नुकतीच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
वादनासाठी बनसोडेने परदेशातून विशेष बॅग व उंचावरील कमी तापमानात चालणारे कमी वजनाचे अँम्प्लिफायर आणले होते. कमी वजनाची गिटारही बनवून घेतली होती. गिटारवादनाच्या वेळी पथकातील सहकारी व शेर्पा असे दहापेक्षा अधिक जण उपस्थित होते. जगातल्या सर्वोच्च उंचीवर ६ मे रोजी भारताचे राष्ट्रगीत वाजवले गेले. तो सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. हा विक्रम करणारा बनसोडे मूळचा सोलापूरचा आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्टच्या मध्यरात्री कॅलिफोर्निया राज्यातील (अमेरिका) माउंट शास्ता शिखरावर राष्ट्रगीत वाजवून त्याने स्वातंत्र्यदिन साजरा करीत एक आगळावेगळा पराक्रम केला होता. एव्हरेस्ट कॅम्प -२ वर हा विक्रम करून बनसोडेने स्वप्न पूर्ण केले. देशासाठी प्रत्येकानेच काही तरी केले पाहिजे, असे त्याला वाटते.
No comments:
Post a Comment