पूर्ववैमनस्यातून चिंचवडला हाणामारी: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)
पूर्वीचे राजकीय वैमनस्य आणि अवैध प्रवासी वाहने भरण्याच्या वादातून भाजप नगरसेवक शीतल शिंदे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळुराम पवार यांच्या गटांतील कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. चिंचवड स्टेशन येथे शनिवारी सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. त्यात पवार यांच्यासह त्यांचा भाऊ आणि मेहुणा जखमी झाला. तर शिंदे यांचे ७ कार्यकर्ते जखमी असून त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. पवार यांच्यावर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात तर अन्य जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
No comments:
Post a Comment