Saturday, 22 February 2014

गूढ ‘धक्का’

पिंपरी : मंगळवारी झालेला स्फोटासारखा आवाज व भूकंपसदृश धक्के दिघी दारुगोळा कोठारातील बॉम्ब व इतर दारुगोळा चाचणीचे नसल्याचे लष्करी विभागाकडून स्पष्ट झाल्याने या धक्क्याचे गूढ वाढले आहे. त्यामुळे या धक्कयातून दिघी, चर्‍होली, धानोरी व भोसरी परिसरातील रहिवाशी अजूनही सावरलेले नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. 

सामान्यांना न्याय देणार : उपायुक्त

पिंपरी : सामान्य नागरिक पोलिसांकडे दाद मागण्यासाठी येत असतो. मात्र, सामान्यांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन भितीदायक आहे. त्याला बरीच कारणे असून सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही. त्यांना न्यायच मिळेल, असे परिमंडळ तीनचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त राजेंद्र माने पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

पोलिसांची वाढली ‘साखर’..

पिंपरी : परिमंडळ तीनमधील एकूण पोलीस कर्मचार्‍यांपैकी तब्बल ७५ टक्के पोलीस कर्मचारी व अधिकारी शारीरिकदृष्ट्या ‘अनफिट’ असल्याचे समोर आले आहे. पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीमधून ही बाब समोर आली आहे. राज्य शासनाने पोलिसांसाठी २00६ पासून २५0 रुपयांचा फिटनेस भत्ता सुरू केला आहे. परंतु, निश्‍चित नसलेले ड्युटीचे तास, खाण्यापिण्याच्या अनिश्‍चित वेळा, कामाचा ताण यामुळे पोलिसांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.
पोलीस खात्यात भरती होताना उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते. ज्यांची शारीरिक क्षमता चांगली, त्यांनाच खात्यामध्ये प्रवेश मिळतो. 

मानसिक गुलामगिरी शिवरायांनी दूर केली

पिंपरी : मरगळलेल्या समाजाच्या अंत:करणांमधील गुलामगिरी छत्रपती शिवाजीमहाराजांनी दूर केली, असे मत प्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांनी व्यक्त केले. 
पालिकेच्या वतीने संभाजीनगर, चिंचवड येथे आयोजित शिवजयंती व्याख्यानमालेत वारी ते बारी या विषयावर चौथे पुष्प गुंफताना कवी सुमंत बोलत होते. पक्षनेत्या मंगला कदम, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. 

शास्तीकराची वसुली होणार बंद

पिंपरी -&nbsp महापालिकेने मूळ मिळकतकर घ्यावा, नागरिकांनी शास्तीकर भरू नये, महापालिकेने थकबाकीदारांच्या घरांसमोर बॅण्ड वाजवू नये व रेडझोनमधील रहिवाशांकडून कर घेऊ नये, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी मंजूर करण्यात आला.

शिक्षण मंडळाच्या कारभाराचे वाभाडे

पिंपरी -&nbsp शिक्षण मंडळाच्या 2014-15 अर्थसंकल्पाला मंजुरी देताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंडळाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढत सूचनांचा भडिमार केला.

Thursday, 20 February 2014

'Light rail to connect Hinjewadi, Talawade'



PUNE: Chief minister Prithviraj Chavan on Wednesday said the state government was contemplating Light Rail Transit (LRT) system connectingHinjewadi IT Park and Talawade MIDC Technology Park to resolve traffic problems faced by professionals.