Sunday, 2 March 2014

पिंपरी-चिंचवडमध्ये मतदारांची संख्या 11 लाखांवर पोहचली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात 80 हजार नव्या मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे मतदारांची संख्या 11 लाखांवर पोहचली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. वयाची 18 वर्षे पूर्ण होणा-या प्रत्येक पात्र नागरिकास मतदार यादीत आपले नाव नोंदविता यावे, मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करता यावी, पत्ता बदलला असल्यास नवीन पत्त्याची नोंद करता यावी आणि दुबार नाव असल्यास किंवा निधन झाले असल्यास त्यांचे मतदार यादीतून नाव वगळता यावे, यासाठी हे अभियान राबविण्यात आले.

चिखलीत मनसेच्या नगरसेवकाचे बेमुदत ...

समाविष्ट गावांना 'बजेट'मध्ये डावलल्याच्या निषेध
महापालिकेच्या अंदाजपत्रकात समाविष्ट गावांना यावेळीही वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्याच्या निषेधार्थ मनसे नगरसेवक राहुल जाधव यांनी आजपासून (गुरुवारी) बेमुदत उपोषण सुरु केले. चिखली-कुदळवाडीतील मुख्य चौकामध्ये ते उपोषणाला बसले आहेत.  

मावळ लोकसभेसाठी 'आप'कडून मारुती भापकर

लोकचळवळीतील कार्यकर्ता आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुध्द लढणारे माजी अपक्ष नगरसेवक मारुती भापकर यांना आम आदमी पक्षाकडून मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
'आप'ने  आगामी लोकसभा निवडणूक लढवणा-या पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. या यादीत 28 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश असून मावळ लोकसभा मतदार संघातून मारुती भापकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

वैद्यकीय परवाना शुल्काच्या ...

कारखाने व उद्योगधंद्यांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालये, दवाखान्यांनाही वैद्यकीय परवाना शुल्क आकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील विविध डॉक्टर्स संघटनांचा त्याला तीव्र विरोध असून याविरोधात उद्या (शुक्रवारी) लाक्षणिक बंदची हाक दिली आहे.
शहरातील विविध पाच डॉक्टर्स संघटनांची चिंचवड येथील फरांदे रुग्णालयात बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.   इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) शहराध्यक्ष डॉ. दिलीप कामत, इंडियन डेन्टल असोसिएशनचे (आयडीए) डॉ. अभिजीत फरांदे, पीसीडीएचे डॉ. रवी कुलकर्णी, निमाचे डॉ. सुहास जाधव, होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. संदीप लुणावत आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.        

मेट्रोसाठी हजारो कोटी; पीएमपीसाठी काय?

मेट्रोसाठी जी तरतूद केली जाणार आहे त्याच्या दहा टक्के म्हणजे एक ते दोन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीत मेट्रोच्या तुलनेत दहापट प्रवासी वाहतूक होऊ शकते, असे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी नमूद केले आहे.

दिवसा घरफोडी करणारे आरोपी पकडले

आरोपींनी सांगवी, पिंपरी, चिंचवड, निगडी, हिंजवडी, औंध, सुसगाव या भागात २५ घरफोडय़ा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडे पॅशन प्रो ही मोटारसायकल होती. या मोटारसायकलवरून ते उच्चभ्रू सोसायटय़ांची पाहणी करीत

शहरात हापूस आंबा आला!

पिंपरी : उन्हाळ्याची चाहूल लागताच वेध लागतात रसरशीत पिवळ्या धमक आंब्याची. बाजारपेठेत रत्नागिरी, देवगडच्या प्रसिद्ध हापूस आंब्याची आवक झाली आहे. 
हिरवा व पिवळ्या रंगातील हापूस आंब्याच्या पेटीची आज चिंचवड येथे आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी काही दिवस लवकर आंब्याची आवक झाली आहे. वातावरण पोषक असल्याचे यंदा आवक मोठी असल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा जून ते जुलै महिन्यापर्यंत आंब्याचा हंगाम चालण्याची शक्यता आहे. चिपळूण, रत्नागिरी येथील आमराईतून आंब्याच्या तीन पेट्या येथे दाखल झाल्या.