Saturday, 9 September 2017

‘आधार’ नोंदणी अभियानाला मुदतवाढीची मागणी

पिंपरी – महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय आधार नोंदणी व दुरूस्ती विशेष अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सोईसाठी ही मुदत महिनाभर वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.

[Video] आधार नोंदणीचा 1325 जणांनी घेतला लाभ; रविवारी पुन्हा आधार नोंदणी अभियान


पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात आज (गुरुवारी) राबविण्यात आलेल्या विशेष आधार कार्ड नोंदणी अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आठही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 1325 नागरिकांनी आधार नोंदणी व आधार दुरुस्ती करुन घेतली आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिली. पिंपरी पालिकेच्या आठही क्षेत्रिय कार्यालयात आज, गुरुवारी आधार नोंदणी व दुरुस्ती अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

खासदारांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन

पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड कंपनीकडून राज्यातील २५ ते ३० लाख नागरिकांचा परतावा मिळावा यासाठी राज्यातील खासदारांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या घराबाहेर १० ते १३ सप्टेंबरदरम्यान घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

चिंचवड तोडफोड प्रकरणातील 18 जण पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी - चिंचवडगाव परिसरात दहशत पसरविण्यासाठी तलवारी, हॉकीस्टिक, पेव्हींग ब्लॉक साहाय्याने मारहाण करत परिसरातील सुमारे 10 चारचाकी व दुचाकींची तोडफोड करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता. 7) रात्री सव्वा दहाच्या सुमारास मंडलमुर्तीवाडा ते हनुमान मंदिर व पागेची तालीम परिसरात घडली. या दोन्ही टोळ्यांतील एकूण 18 जणांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 

“सोशल मीडिया सेल’चा निर्णय रद्द करा

चौफेर न्यूज – महापालिकेच्या “सोशल मिडिया सेल’ स्थापन करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जननी शिशु योजनेचा 12,369 महिलांनी घेतला लाभ

चौफेर न्यूज – माता व बालमृत्यू टाळण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या माध्यमातून महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम योजना राबविण्यात येते. या योजनेचा आजअखेर 12 हजार 369 महिलांनी लाभ घेतला आहे. ही योजना वर्षभर खुली ठेवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीजास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Friday, 8 September 2017

PCMC set to appoint private agency for waste segregation

PIMPRI CHINCHWAD: The health department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation will appoint a private agency for managing door-to-door trash segregation, encouraging decentralized processing and transportation of waste to the Moshi garbage ...