Tuesday, 24 October 2017

वैद्यकीय अधिकारी पदे भरणार, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांची ५३ पदे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या निर्णयास ...

शहराला मंत्रिपद मिळणार का?

शहरातील कोणा एकालाही मंत्रिपद मिळाले तरी चालेल, असे उसने अवसान आणणारे भाजपचे दोन्ही आमदार वास्तवात मात्र मंत्रिमंडळ विस्तारात खुर्ची पक्की करण्यासाठी प्रदेश पातळीवर आपापले वजन वापरू लागले आहेत. तर दुसरीकडे, पक्षात आले आणि ...

माजी महापौर आर.एस.कुमार यांचा पुन्हा भाजप प्रवेश

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आर.एस.कुमार यांनी आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चिंचवड येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कुमार यांनी प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली होती. परंतू त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून ते राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते.

दानवे पुन्हा घेणार झाडाझडती

पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पंधरा दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहर भाजपच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी पदाधिकाऱ्यांना उद्दिष्ट देऊन दिवाळीनंतर आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ही मुदत संपल्याने लवकरच ते पुन्हा आढावा बैठक घेणार आहेत.

परवाना विभागातील अधिकाऱ्यांच्या हाताला “लकवा’

पिंपरी – महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत फ्लेक्‍सचा सुळसुळाट वाढल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. अशा फ्लेक्‍सवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय 10 ते 11 कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके नेमली आहेत. तरीही, बेकायदेशीर फ्लेक्‍सची संख्या वाढतच चालली आहे. पूर्वीच्या एक हजार 849 फ्लेक्‍सपैकी एकाचीही नोंद नसल्याचे उघडकीस आले आहे. तरीही, हा विभाग कारवाई करण्याबाबत ढिम्म भूमिका घेत आहे. त्यामुळे आकाश चिन्ह परवाना विभागातील अधिकाऱ्यांच्या हाताला लकवा झाला की काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

'एमआयडीसी'तही कचराकोंडी

परंतु, औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी परिसर मात्र स्वच्छ भारत अभियानापासून वंचित ठेवण्यात येतो, असा आरोप पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने केला आहे. औद्योगिक परिसरातील कचरा वेळच्या वेळी ...

Monday, 23 October 2017

Pune: Network errors and confusion about filing make GST more complicated for many

A survey conducted by the GST Commissionerate among 600 assesses in Pune region has identified the major technical issues which need urgent attention from GSTN.