पिंपरी – महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट वाढल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. अशा फ्लेक्सवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय 10 ते 11 कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके नेमली आहेत. तरीही, बेकायदेशीर फ्लेक्सची संख्या वाढतच चालली आहे. पूर्वीच्या एक हजार 849 फ्लेक्सपैकी एकाचीही नोंद नसल्याचे उघडकीस आले आहे. तरीही, हा विभाग कारवाई करण्याबाबत ढिम्म भूमिका घेत आहे. त्यामुळे आकाश चिन्ह परवाना विभागातील अधिकाऱ्यांच्या हाताला लकवा झाला की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
No comments:
Post a Comment