पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आर.एस.कुमार यांनी आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चिंचवड येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कुमार यांनी प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली होती. परंतू त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून ते राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते.
No comments:
Post a Comment